बहिणाबाई यांची “खोपा” कविता
1 min readअरे खोपयामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला ..
पिलं निजले खोपयात
जसा झूलता बंगला
तिचा पिलामिध जीव
जीव झाडाले टांगला ..!
सुगिरन सुगिरन
अशी माझी रे चतुर
तिले जलमाचा सांगाती
मिये गनयागमपया नर
खोपा इनला इनला
जसा गिलकयाचा कोसा
पाखराची कारािगरी
जरा देख रे मानसा !
तिची उलूशीच चोच ,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ?