November 19, 2024

Majhi Lekhani

लघुकथा, कविता, लेखन – लेखनासाठी मुक्त व्यासपीठ

कुसुमाग्रज यांची “उठा उठा चिऊताई ” कविता

1 min read

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही


सोनेरी हे दूत आले
घरटयाचया दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही ?


लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे, चोहीकडे


झोपलेलया अशा तुमही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकलया,चिमुकलया ?


बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *